Surat Building Collapse: गुजरात राज्यातील सुरतमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. सहा मजली इरमात कोसळून (Building Collapse)अनेकांनी आपला जीव(Death) गमावला आहे. काल रात्री बचावकार्य सुरू(Rescue work) असताना तिन मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले होते. आता मृतांचा आकडा 7 वर गेला आहे. अजूनही अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सुरतमध्ये सचिन जीआयडीसी भागात ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. कुठल्या कारणामुळे इमारत कोसळली हे अद्याप कळू शखलेले नाही. मात्र, इमारत कमकुवत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
इमारत अचानक कोसळल्याने तिथे राहत असलेले भाडेकरू ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्याखालून एका महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे.
Death toll in Surat building collapse rises to seven: Police
— Press Trust of India (@PTI_News) July 7, 2024
सचिन GIDC भागातील पाली गावात 2017 मध्ये ही इमारत बांधण्यात आली होती. आता या दुर्घटनेत इमारतीत राहणारे 10 ते 15 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या इमारतीत 30 फ्लॅट होते. आणि त्यात पाच ते सहा कुटुंब राहत होते, अशी माहिती सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गहलोत यांनी दिली.