JNU हिंसाचाराचा गौतम गंभीर याने केला निषेध, ट्विटर वरून केली दोषींवर कठोर कारवाईची मागणी
गौतम गंभीर (Photo Credit: ANI)

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने रविवारी (5 जानेवारी) दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (Jawaharlal Nehru University) मुखवटा घातलेल्या लोकांच्या हिंसक हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी या हिंसाचाराचा निषेध केला आणि म्हणाला की, विद्यापीठ कॅम्पसमध्ये अशी हिंसाचार देशाच्या मूल्यांच्या विरोधात आहे. तसेच दोषींवर त्याने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि जेएनयूमधील (JNU) लेफ्ट विद्यार्थी संघटनांनी रविवारी एकमेकांवर लाठी-मारआणि दगडफेक केल्याचा आरोप केला आहे. रविवारी संध्याकाळी मुखवटा घातलेल्या अज्ञाताच्या एका गटाने जेएनयू कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला केला आणि विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आइशी घोष आणि सरचिटणीस यांच्यासह 20 जण जखमी झाले. त्यांच्यावर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी दोनची स्थिती गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. (JNU Violence: विरोधकांनी सरकारला घातला घेराव; पहा काय म्हणाले राहुल गांधी, अरविंद केजरीवाल)

जेएनयूमधील हिंसाचाराबद्दल गंभीर यांनी एक ट्विट केले. त्याने लिहिले की, "विद्यापीठ कॅम्पसमध्ये अशाप्रकारचा हिंसाचार हा या देशाच्या मूल्यांच्या विरोधात आहे. विचारसरणीची कोणती बाजू असो किंवा आपला कल कोणाच्या बाजूने आहे याने फरक पडत नाही. या प्रकारचा हिंसाचार विद्यार्थ्यांविरूद्ध केली जाऊ नये. या गुंडांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, ज्यांनी विद्यापीठात प्रवेश करण्याचे धाडस केले आहे."

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये लाठ्यांसह सशस्त्र काही मुखवटा असलेल्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसमधील मालमत्तेचे नुकसान केले आणि त्यानंतर प्रशासनाला पोलिसांना बोलवावे लागले. अनेक राजकीय नेत्यांनी यावर मत व्यक्त करत हल्ल्याचा निषेध केला. विरोधकांपासून केंद्र सरकारने जेएनयूमधील हिंसाचाराचा निषेध केला. हल्लेखोर वसतिगृहात घुसले आणि विद्यार्थ्यांनी व शिक्षकांना मारहाण केली असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. काही व्हायरल व्हिडीओ फुटेजमध्ये पुरुषांचा गट हॉकीसह इमारतीत फिरताना दिसून दिसून येत आहे.