JNU Violence: विरोधकांनी सरकारला घातला घेराव; पहा काय म्हणाले राहुल गांधी, अरविंद केजरीवाल
Congress President Rahul Gandhi | File Image | (Photo Credits: IANS)

Opposition On JNU Violence: जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) च्या कॅम्पसमध्ये रविवारी सायंकाळी मारहाणीची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आइशी घोष हिला विद्यापीठाच्या आवारात अज्ञात जमावाने मारहाण केली आहे.  लेफ्ट व एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांमध्ये हा मारहाणीचा प्रकार घडला आहे, असं विद्यार्थी संघटनेचा दावा आहे. या हिंसाचारात दोन्ही विद्यार्थी संघटनांचे सुमारे 25 विद्यार्थी जखमी झाले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची (जेएनयूएसयू) अध्यक्ष आइशी घोष आणि शिक्षक सुचित्रा सेन यांनाही गंभीर दुखापत झाली आहे.

यावर विरोधी पक्ष आता सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. चला तर पाहूया विरोधी पक्ष नेत्यांनी यावर कोणत्या शब्दात टीका केल्या आहेत:

राहुल गांधी

या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट केले की, जेएनयूतील विद्यार्थी आणि शिक्षकांवर मास्कधारी अज्ञातांनी केलेला क्रूर हल्ला हा धक्कादायक आहे.

आपल्या राष्ट्राच्या ताब्यात असलेल्या फॅसिस्टांना आमच्या शूर विद्यार्थ्यांच्या आवाजाची भीती वाटते. जेएनयूमधील आजची हिंसा ही त्या भीतीचे प्रतिबिंब आहे.

अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंसाचार त्वरित रोखण्याचे आवाहन केले आहे. केजरीवाल म्हणाले की जेएनयूमधील हिंसाचारामुळे मला खूप धक्का बसला आहे. विद्यार्थ्यांवर वाईट हल्ला झाला आहे. पोलिसांनी तातडीने हिंसाचार थांबवावा आणि शांतता राखली पाहिजे. जर कॅम्पसमध्येही विद्यार्थी सुरक्षित नसतील तर देशाची प्रगती कशी होईल.

दिल्ली सरकारने म्हटले आहे की जेएनयू कॅम्पसची स्थिती लक्षात घेता सात रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत तर 10 रुग्णवाहिका स्टँडबायवर आहेत. कॅम्पसमध्ये एक भारी सुरक्षा दलही तैनात करण्यात आला आहे.

ममता बनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. त्या म्हणाल्या की जेएनयू मधील विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करत आहे. खरंतर अशा प्रकारच्या घटनेवर निषेध व्यक्त करण्यासाठी शब्दच कमी पडतील.

शरद पवार

Violence in JNU: जेएनयूमधील हल्ल्यावर सोनम कपूरने दिली संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली हिंमत असेल तुमचे चेहरे दाखवा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. ते लिहितात, "जेएनयूचे विद्यार्थी आणि शिक्षकांवर भ्याड, परंतु नियोजित हल्ला करण्यात आला आहे. तोडफोड आणि हिंसाचाराच्या या लोकशाही विरुद्ध अशा कृत्याचा मी तीव्रपणे निषेध करतो. लोकशाहीशी निगडित मूल्ये आणि विचार दाबण्यासाठी हिंसक माध्यमांचा वापर कधीही यशस्वी होणार नाही."