Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Chhatishgarh News: छत्तीसगड राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तीन दिवसांपूर्वी एका भाजप नेत्याची हत्या केली. या घटनेने संपुर्ण राज्य हादरला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान नक्षलवाद्यांनी भाजप नेते रतन दुबे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली. या जीवघेणा हल्लेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. छत्तीसगडमध्ये 7  आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदार होणार आहे. गेल्या महिन्यात राजनंदगाव येथे भाजप नेते बिरजू ताराम यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजचे जिल्हा उपाध्यक्ष आणि नारायणपूर जिल्हा पंचायत सदस्य रतन दुबे हे एका निवडणूक सभेला संबोधित करत असताना त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी जीवघेणा हल्ला केला. ते जागीच कोसळले. घटनास्थळी खळबळ उडाली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रतन दुबे यांचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी रुग्णलयात पाठवला, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करुन घेतले. पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

माहितीनुसार आता पर्यंत राज्यात सहा नेत्याची निघृण हत्या करण्यात आली. भाजपचे नेते ओम माथूर यांनी या घटनेला अनुसरून टार्गेट किलिंग असे वर्णन केले आहे.