Cyber Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Bihar Crime News: बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात छठपूजेवरून घरी परतणाऱ्या कुटुंबावर गोळीबार झाल्याने दोन भावांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. ही घटना सोमवारी (20 नोव्हेंबर) सकाळी घडली. गोळीबारामागील हेतू प्रेमप्रकरण असल्याचा संशय आहे. वृत्तानुसार, ही घटना लखीसराय जिल्ह्यातील काबैया पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पंजाबी मोहल्लामध्ये घडली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कावैया पोलीस स्टेशन हद्दीतील शशी भूषण झा यांचे कुटुंबीय छठ पूजेच्या निमित्ताने उगवत्या सूर्याची पूजा करून परतत असताना, हल्लेखोराने गोळीबार केला. या घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत हे सख्खे भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी आशिष चौधरी तो पंजाबी मोहल्ला वॉर्ड क्रमांक 15 मध्ये राहणारा असून त्याने गोळीबार केला. चंदन झा (३१) आणि राजनंदन झा (३१) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत दुर्गा झा, प्रीती देवी, शशी भूषण झा आणि लवली देवी हे जखमी झाले असून त्यांना लखीसराय येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात हे एकतर्फी प्रेमाचे प्रकरण असल्याचे दिसते. आरोपी शशी हा भूषण झा याचा शेजारी आहे. आशिष चौधरीचे घरासमोर राहणाऱ्या तरुणीवर प्रेम होते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे होते, मात्र मुलीच्या घरच्यांचा विरोध होता, त्यामुळे संतापलेल्या तरुणाने तरुणीच्या कुटुंबावर गोळीबार केला.