Exam | प्रतिकात्मक फोटो (फोटो सौैजन्य-Getty Images)

Karnataka: कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने (Karnataka Examination Authority, KEA) राज्यातील विविध मंडळे आणि महामंडळांच्या आगामी भरती परीक्षांदरम्यान कोणत्याही प्रकारचे डोके झाकण्यावर बंदी घातली आहे. याशिवाय, प्राधिकरणाने परीक्षा हॉलमध्ये फोन आणि ब्लूटूथ इयरफोन यांसारखे कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट ठेवण्यास मनाई केली आहे. मात्र, परीक्षा मंडळाने उजव्या विचारसरणीच्या संघटनांच्या निषेधानंतर मंगळसूत्र (Mangalsutra) आणि पायातील जोडव्यांना परवानगी दिली आहे.

परीक्षा प्राधिकरणाच्या ड्रेस कोडमध्ये बंदी घातलेल्या वस्तूंच्या यादीमध्ये हिजाबचा स्पष्टपणे उल्लेख केला नसला तरी, भरती परीक्षेदरम्यान हेड कव्हर्ससंदर्भात नियम लागू केले आहेत. राज्यभरात 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी होणार्‍या विविध मंडळे आणि महामंडळांच्या निवडणुकांपूर्वी ही घोषणा करण्यात आली. (हेही वाचा - Bihar Shocker: पूजेसाठी पाने आणायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून केली हत्या; केळीच्या झाडांजवळ सापडला अर्धनग्न मृतदेह)

कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने म्हटले आहे की, 'परीक्षा हॉलमध्ये डोके, तोंड किंवा कान झाकणारे कोणतेही कपडे किंवा टोपी परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही. ब्लूटूथ उपकरणांचा वापर करून परीक्षेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी हे नियम करण्यात आले आहेत.' केईएने ऑक्टोबरमध्ये झालेल्या भरती परीक्षेदरम्यान हिजाब घालण्याची परवानगी दिली होती.