बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात सोमवारी सकाळी माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. या ठिकाणी आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी NH 55 रोखून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी गोवर्धन पूजेसाठी केळीची पाने आणण्यासाठी जवळच्या बागेत होती. त्यानंतर त्या ठिकाणी तिचा मृतदेह केळीच्या झाडांजवळ अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. मुलगी एकटी पाहून आरोपीने अडवून तिच्यावर अत्याचार केला असावा, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनास्थळावरून पीडितेचे अंडरगारमेंट सापडले आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपीने तिचा गळा दाबून खून केला, पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खून आणि पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. सणासाठी पीडित मुलगी दिवाळीसाठी तिच्या आजीच्या घरी आली असताना ही घटना घडली आहे. (हेही वाचा: Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये आग्रा हॉटेलमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; 5 जणांनी खोलीत बंधक बनवून केले क्रूर कृत्य, आरोपींना अटक)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)