Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रा (Agra) जिल्ह्यातील ताजनगरी फेज-2 येथे असलेल्या होम स्टेमध्ये (Home Stay) शनिवारी रात्री एका मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आला. मुलीने विरोध केला असता तिला मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी याप्रकरणी चार तरुणांना ताब्यात घेतले. या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रात्री उशिरा ताज नगरी फेज-2 मधील होम स्टे मधून मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून लोकांनी होम स्टे मधील घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच ताजगंज पोलीस घटनास्थळी पोहोचले. आरोपींनी पीडित मुलीला दारू पिण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपींनी पीडितेसोबत गैरकृत्य केले. (हेही वाचा -Chhatrapati Sambhaji Nagar Murder: पतीने पत्नीचा गळा दाबून केली हत्या, छत्रपती संभाजीनगर येथील घटना)
हा होम स्टे रवी नावाचा तरुण चालवतो. विरोध केला असता त्याला बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींनी पीडितेचे एक-दोन व्हिडिओ बनवले. सध्या हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परिसरात चालणाऱ्या होमस्टेमध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोप तेथील लोकांनी केला आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.
तरुणीची चौकशी केल्यानंतर एसीपी सदर अर्चना सिंग यांनी होम स्टे बंद केला आणि इतर आरोपींच्या शोधात छापे टाकण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून 4 तरुण आणि एका महिलेला ताब्यात घेतले. डीसीपी सिटी सूरज कुमार राय यांनी सांगितले की, मुलीने जी काही तक्रार दिली त्याविरोधात गुन्हा दाखल केला जाईल. चार तरुणांना पकडले आहे. हा होमस्टे भाड्याने चालवला जात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गेल्या दीड वर्षांपासून होम स्टेमध्ये काम करत होती.