Bengaluru murder suspect dies| Representative Image (Photo Credit: Pixabay)

Bengaluru Mahalakshmi Murder Case: बेंगळुरूच्या व्यालीकवल येथील रहिवासी असलेल्या महालक्ष्मीच्या निर्घृण हत्या प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले होते. या प्रकरणातील ताजी माहिती अशी आहे की, या प्रकरणातील  मुख्य संशयित मुक्ती रंजन रॉय याने ओडिशात आत्महत्या केली आहे. महालक्ष्मी या महिलेच्या हत्येचा मुख्य संशयित म्हणून बेंगळुरू पोलिसांनी रॉयचा शोध सुरु केला होता. अनेक दिवसांच्या तपासानंतर, अधिकाऱ्यांना संशयिताने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. हत्येनंतर फरार झालेल्या रॉयचा मृतदेह ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील एका स्मशानभूमीजवळ सापडला आहे. मूळची नेपाळची असलेल्या महालक्ष्मीच्या हत्येनंतर तो मूळ गावी लपला होता, जिथे त्याने रात्री पळून जाण्याची योजना आखली अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. तो स्कूटरवरून निघाला होता पण त्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांना समजले. हे देखील वाचा: Agra: महिलेवर बलात्काराच्या घटनेनंतर आग्रा शहरातील 50 जिम बंद, 200 जिमला पाठवल्या नोटीस, पोलिसांची कारवाई

मृतदेहा जवळ लॅपटॉप सापडला अशी माहिती स्थानिकांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रक शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी धुसुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी तपास यंत्रणांनी त्याची डायरी आणि लॅपटॉप ताब्यात घेतला आहे.

आरोपी बेंगळुरूच्या हेब्बागोडी भागात राहत होता आणि मल्लेश्वरममधील एका फॅशन स्टोअरमध्ये काम करत होता, जिथे त्याची भेट महालक्ष्मीशी झाली होती. महालक्ष्मीने दुसऱ्या व्यक्तीसोबत मैत्री असल्याचे समजल्यानंतर महालक्ष्मी आणि मुक्तीमध्ये खटके उडायला लागले, ज्यामुळे वारंवार वाद व्हायचे. या तणावामुळेच महालक्ष्मीची हत्या झाली असे तपासकर्त्यांचे मत आहे.

ब्रेकअपनंतर, महालक्ष्मीचा मृतदेह, 50 हून अधिक तुकड्यांमध्ये कापलेला, गेल्या आठवड्यात व्यालीकवल येथील तिच्या भाड्याच्या घरात फ्रिजमध्ये सापडला होता.