Arrest | (Photo credit: archived, edited, representative image)

West Bengal Shocker: पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील पातशपूर येथे बुधवारी एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याने पत्नीचे डोके शरिरापासून वेगळे केले आणि मुडंके हातात घेऊन  भररस्त्यात फिरत राहिला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. डोकं हातात घेऊन चिस्तीपूर बस स्टॉपजवळ आरोपी बसून होता. गौतम गुचैत असं आरोपीचे नाव आहे.  या घटनेनंतर पोलिसांना घटनास्थळी पाचरण करण्यात आले. (हेही वाचा- प्रियकराकडून प्रेयसीला बेदम मारहाण, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी समोर आला व्हिडीओ)

मिळालेल्या माहितीनुसार, गौतमने पत्नीचा डोकं कापला आणि घराबाहेर पडला. कापलेलं मुडंक आणि हत्यार हातात घेऊन फिरत होता. त्यानंतर तो एका चहाच्या टपरीत गेला. चहाच्या टपरीवर एका बाकावर बसला होता त्यानंतर त्याने बाकावर मुंडक ठेवलं, स्थानिक लोकांनी हे पाहून घबराट निर्माण झाली. घटनास्थळी पोलिसांना बोलवण्यात आलं. पातशपूर पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गौतमला अटक करण्यात आले.

या भयावह घटनेनंतर परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. गौतम हा व्यवसायाने फेरीवाला असून त्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशयातून हत्या केली. त्याचे गेल्या काही दिवसांपासून घरात तणावाचे संबंध होते. शेजारच्यांनी पोलिसांना सांगितले की, गौतम हा मानसिकदृष्ट्या ठीक नाही. यापूर्वीही त्याने असेच पराक्रम केले आहे. त्याच्या अनेक घटना चर्चेत आहे. यापूर्वी त्याने प्राणी संग्रालयातील सिंहाच्या पिंजऱ्यात प्रवेश केला होता अशी चर्चा आहे.