Andhra Pradesh: राज्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षांनी कंडोमच्या पॅकेटवर नाव आणि चिन्ह छापून सुरु केला प्रचार
Condoms

Andhra Pradesh:  राजकारणात कंडोम काय भूमिका बजावतात? तुम्हाला हे वाचून नवल वाटले असेल. तर आंध्र प्रदेशात काहीसे असेच घडले आहे. आंध्र प्रदेशात जे घडले त्या घडामोडींवरून राजकारणातील  कंडोमची महत्वाची  भूमिका दिसून येते. लोकसभा निवडणुकीपूर्वी कंडोम हे राज्यात प्रचाराचे साधन बनले आहे, दोन्ही प्रमुख पक्ष त्यांच्या पक्षाचे चिन्ह  कंडोमच्या पाकिटावर छापुन पॅकेट जनतेला वितरित करत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्ष आणि आघाडीचा विरोधी पक्ष, तेलगू देसम पार्टी (टीडीपी) या दोन्ही पक्षांच्या असे  कंडोम पॅक दाखवले आहेत, जे कथितपणे पक्षाच्या कार्यकर्त्यांद्वारे मतदारांना वाटले जात आहेत. India Today ने नुकतेच पक्षाचे चिन्ह असलेल्या पॅकेटचे फोटो पोस्ट केले आहेत.

पाहा फोटो:

 

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या कशी कमी करता येईल यावर चर्चा करताना दिसत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी घरोघरी प्रचार करणारे पक्षाचे नेते कंडोमची पाकिटेही वाटप करत होते.

दरम्यान,  दोन्ही पक्षांनी कंडोम वाटप केल्याबद्दल एकमेकांना फटकारले, परंतु अनेक पक्ष असेच करतांना दिसत आहेत.

"पक्षाचा प्रचार हे कंडोमवर थांबेल की, लोकांमध्ये व्हायग्राचे वितरण सुरू होईल?" जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाने विचारले आहे. प्रतिसादात, टीडीपीने YSRCP लोगोसह एककंडोम पॅक पोस्ट केला आणि विचारले की ही, तयारी 'सिद्धम' आहे का ज्याबद्दल पक्ष बोलत आहे.