मार्च महिन्यात (Bank Holidays in March 2020) अनेक सण आणि सुट्या आल्याने बॅंकेशी निगडित व्यवहारावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मार्च महिन्यात तब्बल 12 दिवस बॅंका बंद असल्याने सामान्य नागरिकांना मोठा फटका बसणार आहे. या वर्षी मार्च महिन्यात बॅंकेला अधिकृतरित्या 7 सुट्ट्या आहेत. यातच 5 सुट्ट्यांची आणखी भर पडल्याने बॅंकेशी निगडीत कामांना अधिक वेळ लागू शकतो. महत्वाचे म्हणजे, काही सण आणि बॅंकेच्या अनेक सुट्ट्या पाठोपाठ आल्याने सलग 2 दिवस बॅंक बंद राहणार आहेत. तसेच अनेकदा असे घडते की, ज्या खातेदारांना बॅंक बंद असल्याची माहिती योग्य नसल्याने त्यांचीही ये-जा होते. यामुळे खालील माहिती बॅंकेतील कर्मचारी आणि खातेदार दोघांसाठीही फायदेशीर ठरणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक सुट्ट्या असल्याचे समजत आहे.
मार्च महिन्यात 8 तारखेला रविवार आल्याने बॅंक बंद राहणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी होळीचा सण आल्याने आंध्रप्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथील सर्व बॅंका बंद राहतील. तसेच 10 मार्च रोजी धूलिवंदनाच्या निमित्ताने संपूर्ण देशात बॅंक बंद राहणार आहे. बिहार आणि झारखंड येथे 11 मार्चला धूलिवंदनाची सुट्टी दिली जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर 14 मार्च रोजी महिन्यातील दुसरा शनिवार आणि 15 मार्च रोजी रविवार आल्याने सलग 2 दिवस बॅंक बंद राहणार आहे. हे देखील वाचा- Holi 2020 Date: होळी कधी आहे? जाणून घ्या होलिका दहनाचा मुहूर्त ते रंगपंचमी सेलिब्रेशनच्या तारखा
मार्च 2020 मधील बॅंकेतील सुट्ट्यांची यादी खालीलप्रमाणे:
तारीख | दिवस | राज्य |
8 मार्च | रविवार | सर्वत्र |
9 मार्च | सोमवार | आंध्रप्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल |
10 मार्च | मंगळवार | बिहार, झारखंड वगळता सर्व राज्यात |
11 मार्च | बुधवार | केवळ बिहार आणि झारखंड |
14 मार्च | शनिवार | सर्वत्र |
22 मार्च | रविवार | सर्वत्र |
25 मार्च | बुधवार | आंध्रप्रदेश, कर्नाटक, लडाख, महाराष्ट्र, मणीपूर, तमिळनाडू, तेलंगणा, गोवा, जम्मू-काश्मीर |
27 मार्च | शुक्रवारी | केवळ झारखंड |
28 मार्च | शनिवार | सर्वत्र |
29 मार्च | रविवार | सर्वत्र |
31 मार्च | मंगळवार | सर्वत्र |
अर्थिक वर्षाच्या समाप्तीमुळे 31 मार्च रोजी संपूर्ण देशभरात बॅंक बंद असतील. मार्च महिन्यात ज्या खातेदारांचे बॅंकेशी निगडीत काही काम असतील, आशा लोकांसाठी वरील वेळापत्रक फायदेशीर ठरणार आहे.