Heart Attack While Performing Ramleela: दुर्दैव! रामलीला सादर करताना अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू,हरियाणातील घटना
Heart Attack PC Twitter

Heart Attack While Performing Ramleela: तरुणांमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाचे प्रमाण वाढत चालले आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे पाच वर्षाच्या मुलीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना  पुन्हा एका तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. हरियाणाच्या भिवानीमध्ये ही घटना घडली आहे. भिवाली मध्ये रामलीलाच्या वेळी स्टेजवर सादरीकरण करत असताना एका 25 वर्षीय  तरुणाला ह्रदयविकाराचा झटका आला. सोमवारी 22 जानेवारीला देशभरात सर्वत्र राम भक्त रामनामाच्या नावात तल्लीन झाले होते त्यावेळीस  ही घटना घडली.

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हरियाणातील भिवानी येथे रामलीलाचे आयोजन करण्यात आले होते. हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीला स्टेजवर परफॉर्म करताना हृदयविकाराचा झटका आला. ही घटना कॅमेरात कैद झाली. तो रामलिला सादर करत असताना अचानक कोसळला, प्रेक्षकांना हा अभिनयाचा भाग असेल म्हणून कोसळला असं वाटलं पण तो पुन्हा उटलाच नाही, थोड्यावेळाने प्रेक्षकांनी त्याला उढवण्याचा प्रयत्न केला. ही घटना कॅमेरात कैद झाली असून घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सगळीकडे आनंदाचा उत्साह साजरा करत असताना ही दुर्घटना झाली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली.