Naxal Encounter in Chhattisgarh: छत्तीसगडमधील Putkel जंगलात CRPF-नक्षलवाद्यांमध्ये चकमक, असिस्टंट कमांडंट शहीद
Naxal Encounter Representational Image (Photo Credit: PTI)

Naxal Encounter in Chhattisgarh: छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात सर्चिंगसाठी गेलेले जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxals) चकमक झाली आहे. उसूर ब्लॉकमधील तिम्मापुरमला लागून असलेल्या पुटकेल (Putkel) जंगलात ही चकमक झाली. परिसरात मोठ्या प्रमाणात माओवाद्यांची उपस्थिती असल्याची माहिती आहे. या चकमकीत एक जवान शहीद आणि एक जवान जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. विजापूरचे एसपी कमलोचन कश्यप यांनी याला दुजोरा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, CRPF 168 बटालियनचे जवान विजापूरच्या उसूर ब्लॉकमध्ये गस्तीवर होते. यादरम्यान तिम्मापूरला लागून असलेल्या पुटकेल जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. CRPF 168 बटालियन आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. झारखंडचे रहिवासी असिस्टंट कमांडंट एसबी तिर्की हे चकमकीत शहीद झाले आहेत, तर एक जवानही जखमी झाला आहे. बासागुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही चकमक घडली. (वाचा - Jammu and Kashmir: Bandipora मध्ये पोलीस दलावर दहशतवादी हल्ला, एक पोलीस शहीद, 5 जवान जखमी)

बिजापूरचे एसपी कमलोचन कश्यप यांनी सांगितले की, त्यांना मोठ्या प्रमाणात माओवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती. अजूनही चकमक सुरूच आहे. त्यामुळे याठिकाणी बॅकअप पार्टीही पाठवण्यात आली आहे. त्याचवेळी जवान जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून माओवादी सातत्याने विविध घटना घडवत आहेत. कालच विजापूरमध्ये एका खासगी कंपनीच्या अभियंत्याचे आणि त्याच्या साथीदाराचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते.