Amul Milk Price Reduce: अमूलच्या दुधाच्या किमती (Amul Milk Price) कमी झाल्या आहेत. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक जयन मेहता यांनी याबाबत माहिती दिली. कंपनीने म्हटले आहे की, त्यांच्या तीन प्रमुख दूध उत्पादनांच्या किमतीत एक रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामध्ये अमूल गोल्ड, अमूल टी स्पेशल आणि अमूल फ्रेश यांचा समावेश आहे. अमूलच्या एक लिटरच्या पाउचची किंमत एक रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
अमूल दुधाच्या किमतीत घट -
अमूलच्या दुधाच्या किमतीत प्रतिलिटर 1 रुपयांची कपात झाल्यानंतर, दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीही कमी होण्याची अपेक्षा आहे. दुधाच्या किमतीतील चढ-उताराचा थेट परिणाम सामान्य जनतेवर होतो. ही किंमत कपात 1 लिटर पॅकच्या दुधाच्या प्रकारांवर लागू आहे. ग्राहक आता सुधारित दरांवर अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि अमूल टी स्पेशल खरेदी करू शकतात. (हेही वाचा -Fare Hike For Mumbai Taxis & Rickshaws: प्रवाशांच्या खिशाला फटका! मुंबईत टॅक्सी आणि रिक्षांच्या दरात 3 रुपयांची वाढ, 1 फेब्रुवारीपासून नवे दर लागू)
अमूल दूधाच्या नवीन किंमती -
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन किंमतींच्या घोषणेनंतर, 66 रुपये प्रति लिटर दराने विकले जाणारे अमूल गोल्ड 54 रुपयांना उपलब्ध होईल. त्याच वेळी, अमूल ताजाची किंमत 54 रुपयांवरून 53 रुपयांपर्यंत कमी होईल. तर, अमूल टी स्पेशल दुधाच्या एक लिटर पॅकची किंमत एक रुपयाने कमी होऊन ती 62 रुपयांवरून 61 रुपये होईल. (हेही वाचा: ST Bus Fare Hike: एसटी तिकीट दरात 14.95% भाडेवाढ; महाराष्ट्रात रस्ते प्रवास महागला)
अमूलचे निवेदन -
दरम्यान, जयन मेहता यांनी सांगितले की, आमच्या उत्पादनांची उच्च गुणवत्ता राखून ग्राहकांना फायदा व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन किंमत रचना आमच्या ग्राहकांना चांगली सेवा देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करते. आवश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमध्ये दुधाच्या किमती कमी केल्याने सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.