Soumya Shetty Arrested: साऊथ चित्रपटातील अभिनेत्री सौम्या शेट्टी हीला चोरीच्या आरोपी खाली पोलिसांनी अटक केले आहे.या घटनेनंतर चित्रपट क्षेत्रात एकच खळबल उडाली आहे. सोम्या शेट्टीने तब्बल एक किलोहून अधिक सोने चोरल्याचे समोर आले आहे.घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच, पोलिसांनी आरोपी सौम्यावर शेट्टीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. मैत्रिणीच्या घरी चोरी केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौम्या शेट्टीने विशाखपट्टनममधील निवृत्त पोस्ट कर्मचाऱ्याच्या घरातून १५० तोळं सोन्याची चोरी केली. सौम्याने चोरी केल्यानंतर गोव्याला फिरायला गेली. अटकेनंतर सौम्या ही पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. प्रसाद बाबू यांच्या घरातून चोरी केली. सुरुवातीला त्यांनी बाथरुममध्ये जाण्याचा बहाणा केला आणि त्यानंतर खिडकीच्या माध्यमातून उडी मारून बेडरूममध्ये शिरून सोने चोरले.( हेही वाचा- रुग्णालयातून बाळाची चोरी, खळबळजनक घटनेचा व्हिडिओ आला समोर)
सौम्या चोरी करून थेट गोव्याला फिरायला गेली. त्यानंतर प्रसाद बाबू यांनी पोलिसांना तक्रार केली. सोनं चोरी झाल्यांने सौम्यावर संशय घेण्यात आला. सौम्या ही प्रसाद बाबू यांच्या घरात नेहमी यायची. त्यामुळे तीच्या चौकशीसाठी पोलिसांनी थेट गोव्यावरून तीला ताब्यात घेतलं. पोलिसासमोर सौम्याने गुन्ह्याची कबुली केली आणि तीच्याकडून 74 ग्राम सोनं जप्त केलंय. तीच्यावर पोलिसांनी सोन्याचा चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सौम्या हीनं अनेक तेलगू चित्रपटात काम केले आहे.