मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातून अवघ्या 20 दिवसांच्या नवजात बाळाची चोरी केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यानंतर कांदिवली पोलिसांनी या घटनेअंतर्गत गुन्हा दाखल करून घेतला आहे. या घटनेची सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. मुलाची चोरी करून पळून जातानाचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. (हेही वाचा- बाल लैंगिक शोषण सामग्री अपलोड करणाऱ्या YouTube चॅनलवर गुन्हा दाखल)
मिळालेल्या माहितीनुसार, चोरी करणाऱ्या आरोपी महिलेला मालवणी परिसरातून अटक केली आहे. तसेच पोलिसांनी बाळाला आरोपीकडून ताब्यात घेऊन सुखरूप आईकडे सुपुर्द केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे अनेकांनी रुग्णलयातील व्यवस्थापनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. आरोपी महिलेने बाळाच्या आईशी ओळख रुग्णालयात काढली. त्यानंतर आरोपी महिलेने मुलाच्या आईला तोंड धुण्यासाठी पाठवले. आणि मी बाळाला संभाळते असं सांगत, ती बाळासोबत गपचूप पळून गेली. या घटनेनंतर मुलाच्या आईने तात्काळ रुग्णालयातील प्रशासनाला माहिती दिली.
मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातून 20 दिवसांच्या नवजात बाळाची चोरी... pic.twitter.com/bN5x4OGKvN
— Ruchika (@Ruchika66964659) January 12, 2024
त्यानंतर मालवणी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तात्काळ महिलेला अटक केले. महिलेची चौकशी केल्यानंतर तिनं गुन्हाची कबुली केली. तिला मुलं नसल्यामुळे चोरी केल्याचे समोर आले. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांवर आणि व्यवस्थापानावर प्रश्न उभा केला. पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखळ करत बाळाला आईच्या ताब्यात दिले.