Delhi Crime: लिव्ह - इन पार्टनरची हत्या करण्याऱ्या आरोपीला राजस्थानमधून अटक
Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

Delhi Crime: दिल्लीत गेल्या काही दिवसांपूर्वी एका महिलेची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. ही हत्या तिच्या लिव्ह इन पार्टनरने केली असावी असा संशय पोलिसांना होता. दिल्लीत पार्टनरसोबत राहत असलेल्या घरातील एका कपाटामध्ये तीचा मृतदेह पोलिसांना सापडला. या घटनेमुळे दिल्ली शहरातील नैऋत्य भागेत खळबळ उडाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर आरोपीचा तपास सुरु केला. हत्येनंतर आरोपी फरार होता. पोलिसांनी महिलेच्या हत्ये प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आले आहे. (हेही वाचा- लिव्ह इन पर्टनरची हत्या, घरातील कपाटात लपवला मृतदेह; दिल्ली येथील घटना

आरोपीला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला पोलिसांनी राजस्थान येथून अटक करण्यात आले असून त्याला दिल्लीला घेऊन येत आहे. विपूल दर्जी असं आरोपीचे नाव आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली पोलिस टीम सोमवारी राजस्थान येथे रवाना झाली होती. राजस्थान येथून आरोपीला दिल्लीच्या पथकाने ताब्यात घेतले.

बेपत्ता महिलेची हत्या

महिला सुरुवातीला बेपत्ता होती. कुटुंबियासोबत संपर्क होत नसल्यानेमुळे पोलिसांनीकडे तक्रार करण्यात आली.पोलिसांनी तीच्या लिव्ह इन पार्टनरच्या घरी छाप टाकला. त्यावेळी पोलिसांनी संपुर्ण घर शोधले परंतु काहीच हाती लागले नाही, शेवटी कपाट उघडले आणि कपाटात महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेचा मृतदेह पोलिसांनी पोर्स्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, आरोपी महिलेला नेहमी मारहाण करायचा. मानसिक छळ द्यायाचा.