Arvind Kejriwals PA Misbehaved With Swati Maliwal: आम आदमी पार्टीच्या (AAP) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी आप (AAP) नेते संजय सिंह (Sanjay Singh) यांचे वक्तव्य समोर आले आहे. संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन करण्यात आले. हे गैरवर्तन मुख्यमंत्री केजरीवाल यांचे पीएस विभव कुमार यांनी केले. स्वाती मालीवाल यांच्यासोबत काल घडलेली घटना निंदनीय घटना आहे. अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणाची दखल घेत कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, स्वाती मालीवाल सोमवारी सकाळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी सीएम हाऊसमध्ये गेल्या होत्या आणि त्या ड्रॉईंग रूममध्ये थांबल्या होत्या. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांचे पीएस विभव कुमार आले आणि त्यांनी स्वाती मालीवाल त्यांच्याशी गैरवर्तन केले. स्वाती यांनी 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. स्वाती यांनी महिला आणि देशासाठी खूप काम केले आहे, त्या पक्षाच्या जुन्या आणि ज्येष्ठ नेत्या आहेत, आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत, असं संजय सिंह यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -Delhi's Tihar Jail Recieved Bomb Threat: राजधानी दिल्लीत नेमकं चाललयं तरी काय? विमानतळ आणि शाळांनंतर दिल्लीतील तिहार तुरुंगात बॉम्बची धमकी)
पहा व्हिडिओ -
स्वाति मालीवाल के आरोप पर संजय सिंह का बयान pic.twitter.com/gc2VopzlMk
— AAP (@AamAadmiParty) May 14, 2024
विशेष आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था रवींद्र सिंह यादव यांनी सांगितले की, स्वाती मालीवाल सोमवारी सकाळी 9:10 वाजता त्यांच्या वैयक्तिक कारमधून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटायचे होते, मात्र त्यांच्या निवासस्थानी उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना भेटण्यास नकार दिला. यावर थोडासा वादावादी झाल्यानंतर स्वाती यांनी 9:31 वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव विभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आरोप केला.