
Madhya Pradesh Shocker: लॉची (Law) पदवी घेत असलेल्या एका तरुणीचा ग्वाल्हेर किल्ल्यावरून पडून मृत्यू (Death) झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे मित्रांसोबत ती किल्ल्यावर जात होती. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस या प्रकरणी तपासणी करत आहे. ही हत्या आहे की, आत्महत्या याचा तपास पोलिस करत आहेत. (हेही वाचा- पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार, PSI वर गुन्हा दाखल)
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर या ठिकाणी ही घटना घडली आहे. आकृती भदौरिया असं मृत तरुणीचे नाव आहे. तरुणी डीडी नगरची रहिवासी होती. एका खासगी विद्यापीठातून बीबीए एलएलबी करत होती. आकृतीची हत्या झाली की तिनं आत्महत्या केली याचा पोलिस शोध घेत आहे.
आकृती मित्रांना भेटण्यासाठी घरातून निघाली. सर्व मित्र मंडळी ग्वाल्हेर किल्ल्यावर येथे भेटले. भेटल्यानंतर आकृती आणि काही मित्रांमध्ये तिथे भांडण झाल होते असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते. त्यानंतर आकृतीचा किल्ल्यावरून पडली. तीला कोणी धक्का दिला की, तिनं आत्महत्या केली हे अद्याप समोर आले नाही. किल्ल्यावरून पडून तीचा मृत्यू झाला. तरुणीचा किल्ल्यावरून पडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी देण्यात आली. घटनास्थळी पोलिस आले.पोलिसांनी आकृतीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ग्वाल्हेर पोलिस या प्रकरणी पुढील चौकशी करत आहे. पोलिसांनी तीच्या मित्रांना ताब्यात घेतला आहे. नेमकां कश्यावरून वाद झाला याची विचारणा करत आहे. गावात या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आकृतीचे वडील संजय सिंह भदौरिया हे केंद्रीय गृहमंत्रालयात सुरक्षा अधिकारी असून ते दिल्लीत तैनात आहेत