
Sri Lanka Women's National Cricket Team vs India Women's National Cricket Team: श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka Women's Cricket Team vs India Women's Cricket Team ) एकदिवसीय तिरंगी मालिकेचा अंतिम सामना 10 मे (रविवार) रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाविरुद्ध ७६ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला असला तरी, यजमान श्रीलंका महिला संघाने 2025 च्या श्रीलंका महिला तिरंगी मालिकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, जिथे त्यांचा सामना आता बलाढ्य भारत महिला क्रिकेट संघाशी होईल. भारतीय महिला संघाने गट टप्प्यात अव्वल स्थान पटकावले, तर यजमान श्रीलंकेने दुसरे स्थान मिळवले आणि अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या गट सामन्यात, क्लो ट्रायॉनच्या हॅटट्रिकने श्रीलंकेला धक्का दिला आणि त्यांना 76 धावांनी पराभव पत्करावा लागला.
भारतीय महिला संघाने गट टप्प्यात एकूण चार सामने खेळले, त्यापैकी तीन जिंकले आणि फक्त एकच पराभव पत्करावा लागला, जो त्यांचा श्रीलंकेविरुद्धचा शेवटचा गट सामना होता. दुसरीकडे, श्रीलंकेच्या महिला संघाने दोन सामने जिंकले आणि दोन गमावले. त्यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोघांविरुद्ध एक विजय मिळवला आणि प्रत्येकी एक सामना गमावला. अंतिम सामन्यापूर्वी, भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयाच्या आत्मविश्वासाने मैदानात उतरेल, तर श्रीलंकेला मागील पराभवातून सावरून स्वतःला सिद्ध करावे लागेल. अंतिम सामना दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठा आणि जेतेपद जिंकण्याची सुवर्णसंधी असेल.
श्रीलंका महिला विरुद्ध भारत महिला हेड टू हेड रेकॉर्ड: भारत महिला आणि श्रीलंका महिला यांच्यात आतापर्यंत 34 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या काळात भारतीय संघाने 30 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेच्या महिला संघाने फक्त 3 सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही.