
Stuart MacGill Convicted Drug Supply: कोकेन तस्करी प्रकरणात न्यायालयाने ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज स्टुअर्ट मॅकगिलला (Stuart MacGill) शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्याला तुरुंगवासाची शिक्षा देण्याऐवजी सामुदायिक सेवा करण्याचे आदेश दिले आहेत. डाउनिंग सेंटर जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान माजी कसोटी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी त्यांना पाठिंबा दिला. मार्च 2025 मध्ये, एप्रिल 2021 मध्ये मॅकगिलला 1 किलो कोकेन प्रकरणातून (Cocaine Case) निर्दोष मुक्त करण्यात आले. परंतु ते पुरवल्याबद्दल दोषी आढळले. याच प्रकरणात, शुक्रवारी (9 मे) न्यायालयाने त्याला ही शिक्षा सुनावली. दिग्गज फिरकी गोलंदाज मॅकगिलने एकदा शेन वॉर्नला जोरदार टक्कर दिली होती.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
ऑस्ट्रेलियाचा माजी लेग-स्पिनर स्टुअर्ट मॅकगिलवर एप्रिल 2021 मध्ये एक किलो कोकेन विकल्याचा आरोप होता. या प्रकरणाची सुनावणी सिडनी जिल्हा न्यायालयात झाली. न्यायालयाने मॅकगिलचा या घटनेत सहभाग असल्याचे मान्य केले. परंतु त्याला मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करणाऱ्या कोणत्याही टोळीचा सदस्य नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात, न्यायालयाने त्याला एक वर्ष आणि 10 महिने सामुदायिक सुधारणा सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे. या काळात, तो ड्रग्ज घेत नाहीये याची खात्री करण्यासाठी त्याला दररोज स्वतःची तपासणी करावी लागेल.
शेन वॉर्नशी तुलना
स्टुअर्ट मॅकगिलने ऑस्ट्रेलियासाठी 44 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने 184 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 774 विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नमुळे मॅकगिल ऑस्ट्रेलियाकडून जास्त काळ खेळू शकला नाही, पण त्याची तुलना शेन वॉर्नशी नक्कीच केली जात असे. कारण शेन वॉर्न त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा नंबर वन स्पिनर होता. मॅकगिलने 44 कसोटी सामन्यात 208 बळी घेतले. तर तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 6 विकेट्स घेतल्या.