
Pakistan Super League 2025: भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावाच्या शिखरावर आहेत. पाकिस्तानने भारतातील जम्मू, नौशेरा, सांबा आणि उधमपूर येथे ड्रोन हल्ले केले आहेत. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे ड्रोन पूर्णपणे उधळून लावले. आता भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानला अपमान सहन करावा लागला आहे. त्यांना पाकिस्तान सुपर लीग 2025 (PSL 2025) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलावी लागली आहे.
पाकिस्तान सुपर लीग यापूर्वी यूएईमध्ये होणार होती
भारतासोबत सुरू असलेल्या लष्करी संघर्षामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यापूर्वी टी-20 स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्याची घोषणा केली होती. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये असे म्हटले आहे की, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्यानुसार पीएसएल 2025 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे बीसीसीआयशी चांगले संबंध
बीसीसीआयशी चांगले संबंध असल्याने, पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) चे उर्वरित सामने आयोजित करण्याची पीसीबीची विनंती अमिराती क्रिकेट बोर्ड मान्य केले नाहीत.
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले होते. भारताने त्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी बहुतेक पर्यटक होते. तेव्हापासून भारताने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांद्वारे पाकिस्तानचे बरेच नुकसान केले आहे.