Photo Credit- X

 Ayodhya: उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यातील कुमारगंज येथे सोमवारी एका अज्ञात मुलीचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळून आला. मुलीचे हात आणि पाय कपडाने बांधले होते. घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मुलीची हत्या झाल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात सांगितले. (हेही वाचा- अपंग महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्या- रायबरेली महामार्गावरील सर्वोदय इंटर कॉलेज रामगंजाजवळ एका अज्ञात तीस वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. मुलीचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेह गोणीत असून तीचे हातपाय बांधलेले होते. त्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. तरुणीचा चेहरा चांगलाच भाजला होता.

घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली. घटनास्थळी मृत मुलीची ओळख पटवणारे कोणतीह पुरावे तेथे आढळले नाहीत. मृत मुलीची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.  या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली. तरुणीची हत्या कोणी केली हे अद्याप समजले नाही. तीचा चेहरा जळलेला असल्याने तिची ओळख पटणे पोलिसांना मुश्किल झाले आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. परिसरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.