Rape

Sikkim Sexual Harassment: वृद्ध दिव्यांग महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सिक्कीम पोलिसांनी गुरुवारी एका व्यक्तीला अटक केली आणि तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आरोपींवर कथित कृत्याचे व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर अपलोड केल्याचाही आरोप आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर महिलेच्या कुटुंबातील सदस्याने (61) बुधवारी जोरथांग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. Woman Hit By Railway Video: रुळ ओलांडताना महिलेला रेल्वेची धडक, RPF जवानाच्या चपळतेमुळे वाचले प्रवाशाचे प्राण, थरारक घटनेचा Video व्हायरल

एका 19 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून 16-18 वयोगटातील तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याला शुक्रवारी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.