Uttar Pradesh Thrashed Video: रामपूरमध्ये तरुणावर अत्याचार, घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांकडून गुन्हा दाखल
uttar pradesh trassed pc twiiter

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रामपूरमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल होत आहे.  हल्लेखोरांना पोलिसांची धाक उरलीच नाही असं चित्र दिसून येत आहे. तरुणाला हल्लेखोरांनी निर्दयीपणे मारहाण केल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनावर प्रश्न उभा केला आहे. (हेही वाचा- रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर दगडफेक)

मिळालेल्या माहितीनुसार, रामपूरमधील एका तरुणाला बेदम मारहाण करत आहे. पीडितेला बळजबरीने दुचाकीवरून बसवून नेले आहे. त्याच सोबत त्याला कोंबडा बनवण्याचे शिक्षा दिली. एवढं नव्हे तर त्याला क्रूरपणे चप्पल आणि लाथांना मारहाण केली. एकाने ही घटना फोनमध्ये कैद केली. अपमानास्पद तरुणाच्या मारहाणीचा व्हिडिओ स्टेटसवर ठेवला. तरुणाला मारहाण का केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच पोलिसांनी प्रतिक्रिया देत गुन्हा दाखल केला. पोस्टला उत्तर देताना, X वर रामपूर पोलिसांनी सांगितले की, “ सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनमध्ये तरुणाच्या मारहाण आणि व्हायरल व्हिडिओबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला आहे.  पुढील तपास आणि कारवाई सुरू आहे. ” व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी कंमेट केले आहे. हल्लेखोरांवर लवकरच कारवाई झाली पाहिजे असं एकाने लिहलं आहे.