उन्नाव येथील दुष्कर्माविरोधात सफदरजंग रुग्णालयाबाहेर एका अंदोलनकर्त्या महिलेचा 6 वर्षीय चिमुकलीला जाळण्याचा प्रयत्न

संपूर्ण देशात महिला सुरक्षित नसून उन्नाव (Unnao rape case) येथील पीडिताचा बलात्कार आणि हत्या केलेल्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. यातच उन्नाव येथील दुष्कर्माविरोधात सफदरजंग रुग्णालयाबाहेर एका अंदोलनकर्त्या महिलेने तिच्या 6 वर्षीय चिमुकलीला जाळण्याचा प्रयत्न केला आहे. उन्नाव प्रकरणातील पीडित तरुणीचा 2 आरोपींनी बलात्कार केला होता. त्यापैकी एका अटक झाली असून दुसरा आरोपी फरार आहे. पंरतु, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला गेल्या 10 दिवसांपूर्वी जामीन मिळाला असून पीडित गुरुवारी न्यायालयात जात होती. त्यावेळी पीडितला जाळण्यात आले. यात पीडित 90 टक्के भाजली होती. यामुळे शुक्रवारी रात्री 10.40 च्या सुमारास पीडितने सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

हैदराबाद येथील पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या केलेल्या चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काउंटर केले आहे. एकीकडे तेलंगणा पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतूक होत आहेत, तर दुसरीकडे उन्नाव प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा यासाठी महिलांनी आवाज उठवला आहे. दरम्यान, महिलांनी सफदरजंग रुग्णालयातबाहेर गर्दी करत संबधित पीडितेला योग्य न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. एवढेच नव्हेतर, उन्नाव येथील दुष्कर्माविरोधात एका महिलेने रुग्णालयाबाहेर अंदोलन करत स्वत:च्या 6 वर्षीय मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला पोलिसांकडून हा धक्कादायक प्रकार रोखण्यात आला. हे देखील वाचा- Unnao Hang Brahmin Rapists: 'दोषींना तातडीने फाशी देण्यात यावी' हैदराबाद प्रकरणातील पीडिताच्या वडिलांची मागणी

एएनआयचे ट्विट-

महिलांच्या सुरक्षितबाबतचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला असून सरकारकडून यावर आळा घालण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. हैदराबाद येथे बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे, असा दावा अनकांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर उन्नाव प्रकरणातील घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळत आहे.