Photo Credit- X

Hamirpur Accident: हमीरपूर जिल्ह्यातील रथ परिसरात एका अपघातात वेगाने येणाऱ्या मोटारसायकल स्वाराने लहान मुलाला चिरडल्याची घटना (Hamirpur Accident) घडली. या अपघातानंतर मुलाची प्रकृती गंभीर आहे. मोटारसायकलने मुलाला जवळजवळ 20 पावले ओढत नेल्याचे दिसते. ज्यामुळे स्थानिक समुदाय चांगलाच संतापला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा रस्त्याच्या कडेला खेळत असताना एक मोटारसायकलस्वार वेगाने जात होता. त्याने नियंत्रण गमावल्याने मुलगा गाडीत अडकला आणि बराच अंतर रस्त्यावर ओढला गेला आणि शेवटी दुचाकी थांबली. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी मुलाला मोटारसायकलखालीतून बाहेर काढले. त्याला तातडीने वैद्यकीय मदतीसाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि घटनेचा तपास सुरू केला आहे.