Man Beating Pet Dog: लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्याला बेदम मारहाण, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद, नेटकरी संपापले
Man Beating Pet Dog PC TWITTER

Man Beating Pet Dog: दिवसेंदिवस प्राण्यांच्या क्रुरतेचा घटना वाढत आहे. दोन महिन्यांपूर्वी ठाण्यात एका ग्रुमींग सेंटरवर एका कर्मचाऱ्याने पाळीव प्राण्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत होता. त्यात आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. एक माणून पाळीव कुत्र्याला वारंवार आहे. लिफ्टमधून घरी घेऊन जात असताना लिफ्टमध्ये घडलेला हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (हेही वाचा-  प्राण्यांच्या केअर सेंटर मध्ये कुत्र्याला मारहाणीचा व्हिडिओ वायरल;

मिळालेल्या माहितीनुसार, ही गुरग्राम येथील सेक्टर 54 मधील ऑर्किड गार्डन्समध्ये घडला आहे. हे संपुर्ण क्रुर कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने हे फुटेज व्हायरल होत आहे. लिफ्टमध्ये गोल्डन रिट्रीव्हर कुत्रा आणि त्यासोबत एक व्यक्ती आहे. जो त्याला खाली फिरवण्यासाठी घेऊन जातो. त्याने कुत्र्याच्या नाकावर फोल्डिंग लिटर स्कूपने मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो त्याला सतत डोक्यावर चापट मारतो. ही घटना ९ मे रोजी घडली आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संतापलेल्या नेटकऱ्यांनी केली आहे. "जर तुमच्याकडे एखाद्या प्राण्याची काळजी घेण्यासाठी वेळ नसेल, तर त्याला घेऊ नका," असे एका वापरकर्त्याने सांगितले. काहींनी या व्हिडिओ पोस्ट करत गुरुग्राम पोलिसांना टॅग केले आहे. प्राण्यांना क्रुरपणे मारहाण करणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.