ठाण्यामधील R Mall जवळ असणार्या Vetic Pet Clinic मध्ये कुत्र्याला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. श्वानप्रेमींची तळ पायातील आग मस्तकात नेणारा हा व्हिडिओ झपाट्याने वायरल होत आहे. व्हिडीओ मधील प्रकार पाहता अनेकांनी या मारहाण करणार्या व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अनेक प्राणी प्रेमींनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हा प्रकार ग्रुमिंग आणि केअर सेंटर मधील असल्याने खरंच प्राणी या ठिकाणी सुरक्षित आहेत का? असा सवाल त्यांच्याकडून विचारला जात आहे. यामध्ये सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया व्यक्त करत आपला राग व्यक्त केला आहे.
दरम्यान सोशल मीडीया रिपोर्ट्सनुसार या व्हिडिओ मधील कुत्र्याला मारहाण करणार्या व्यक्तीला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. पोलिसांनी देखील या प्रकरणाची दखल घेत संबंधित तरूणाला अटक केली आहे. Dogbite Victims To Get Compensation: आता कुत्रा चावल्यावर सरकारला द्यावी लागणार भरपाई; दाताच्या प्रत्येक खुणेसाठी मिळणार 10,000 रुपये, न्यायालयाचे निर्देश .
पहा व्हिडिओ
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये एक Vetic staff गणवेशामध्ये दिसत आहे. तो कुत्र्याला मुद्दामून मारहाण करताना दिसत आहे. हा प्रकार करताना त्याला कोणतीही अपराधीपणाची देखील भावना नाही. स्वतःच्या बचावासाठी जो पर्यंत कुत्रा आवाज करत नाही, पळत नाही तो पर्यंत तो कुत्र्याला मारताना दिसत आहे. नंतर कुत्राच दरवाजाकडे धावला आणि तेथून बाहेर पडला, त्याआधी त्या माणसाने पाळीव कुत्र्याला हसून लाथ देखील मारल्याचे दिसले आहे.
सोशल मीडियावरील संतापाच्या पलिकडे काहींनी क्लिनिकमध्ये जाऊन तेथील प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल कर्मचारी आणि व्यवस्थापकांना प्रश्न विचारले.