Uttar Pradesh Molestation case Photo Credit X

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ७ वर्षाच्या मुलीचा वियनभंग केल्याचे समोर आले आहे. मंदिरातील पुजारीने विनयभंग केल्याचे आरोप आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने पुजाऱ्याला मारहाण केली आहे.आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा-  लखनऊमध्ये चालत्या स्कॉर्पिओमध्ये मॉडेलसोबत सामूहिक बलात्कार, चित्रपटात भूमिका देण्याच्या बहाण्याने बोलवले होते)

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील हापूर येथील नगर कोतवाली परिसरात लज्जपूरी भागात घडली आहे. मंदिरात ७ वर्षाची मुलगी खेळत होती त्यावेळी संधी साधून पुजारीने मुलीसोबत गैरवर्तन केले. मुलीने घडलेला प्रकरा घरच्यांना सांगितला. संतप्त कुटुंबानी पोलिस तक्रार करण्यापूर्वी मंदिरात पोहचले. मंदिरात जाऊन पुजाऱ्याला मारहाण केली.

पुजाऱ्याला मारहाण 

मारहाण केल्याचा एकाने व्हिडिओ फोनमध्ये कैद केला. तर दुसरीकडे घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, संतप्त लोकांनी पुजारीला मारहाण केली. पुजारी कुटुंबाची माफी मागत आहे.  लोकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यापूर्वी आरोपीने एका मुलीचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला. आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.