Delhi Murder: दारूच्या व्यसनामुळे वाद विकोपाला, बायकोच्या पोटात चाकू भोसकून नवरा पोलिसांच्या स्वाधीन
Representational Image | (Photo Credits: PTI)

दिल्ली (Delhi) येथील एका 45 वर्षीय व्यक्तीने पत्नीची हत्या (Murder) करून पोलिसांच्या स्वाधीन झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना मंगोलपुरी (Mangolpuri) परिसरात शनिवारी (31 जुलै) सकाळी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला दारू पिण्याचे व्यसन आहे. तसेच तो काहीच कामधंदा करत नसल्याने पती आणि पत्नीत वारंवार भांडण होत. याच वादातून आरोपी पतीने पत्नीच्या पोटात चाकू भोसकून तिची हत्या केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

समीरचे काही वर्षांपूर्वी शबानासोबत लग्न झाले होते. या दोघांना 21 आणि 17 वर्षाचे दोन मुले आहे. समीरला दारूचे व्यसन असून तो कुठेही कामधंदा करत नव्हता. यामुळे दोघांत सतत वाद होत असे. दरम्यान, या दोघांत शनिवारी सकाळी याच मुद्द्यावरून भांडण पेटले. यावेळी राग अनावर झाल्याने समीरने शबानाच्या पोटात चाकू भोकसला. यात गंभीर जखमी झालेल्या शाबनाला शेजारी रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. त्यानंतर समीर रक्ताने माखलेला चाकू घेऊन पोलीस ठाण्यात गेला आणि आपला गुन्हा कबूल केला. हे देखील वाचा-Bihar Murder: धक्कादायक! पाचशे रुपयाच्या वादातून थोरल्याकडून धाकट्या भावाची हत्या

दरम्यान, मुंबईच्या कळव्या परिसरात एका व्यक्तीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडीने प्रहार करत तिची हत्या केली आहे. हत्येचा हा प्रकार शुक्रवारी (23 जुलै) सायंकाळी 6 ते शनिवारी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान घडला आहे. या प्रकरणी आरोपी पतीविरुद्ध शनिवारी मध्यरात्री कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली होती.