Bihar Murder: धक्कादायक! पाचशे रुपयाच्या वादातून थोरल्याकडून धाकट्या भावाची हत्या
Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

बिहारच्या (Bihar) कैमूर (Kaimur) जिल्ह्यातील मोहनिया (Mohania) पोलीस स्टेशनच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या परिसरातील एका तरूणाने 500 रुपयाच्या वादातून त्याच्याच धाकड्या भावाची हत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी (30 जुलै) संध्याकाळी घडली आहे. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन थोरल्या भावाला अटक केली आहे. तसेच धाकट्या भावाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी मोहनिया पोलिसांनी अधिक चौकशीली सुरुवात केली आहे.

मोहनियाचे स्टेशन प्रभारी आर के यादव यांनी सांगितले की, आरोपी थोरला भाऊ रामू शर्माचे 500 रुपये चोरीला गेले होते. तर, त्याचा मृत धाकडा भाऊ सोनू शर्मानेच पैसे चोरल्याचा रामूला संशय होता. दरम्यान, रामूने सोनूकडे पैसे परत करण्याची मागणी केली. ज्यामुळे त्यांच्यात वाद झाला. या वादातून रामूने सोनूला बेदम मारहाण केली. यामुळे सोनूचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- Gangster Chhota Rajan: गँगस्टर छोटा राजन याला एम्समधून डिस्चार्ज, तिहार कारागृहात रवाना

महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे काही दिवसांपूर्वी दोन सख्या भावंडात किरकोळ कारणांवरून वाद झाला होता. या वादातून थोरल्या भावाने धाकट्या भावाच्या पोटात सूरा भोकसला होता. ज्यामुळे धाकट्या भावाचा उपाचारपूर्वीच मृत्यू झाला. ही घटना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडली होती. याप्रकरणी माहून पोलीस ठाण्यात थोरल्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली होती.