Jaspreet Runs Roll Shop Video PC twitter

Viral Video: दिल्लीतील टिळक नगर भागात एक १० वर्षाचा मुलगा रोल विकत असल्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यातच उद्योगपती आनंद महिंद्रा यांची पोस्ट व्हायरल होत आहे. त्यांनी या मुलाच्या भविष्यासाठी मोठी घोषणा केली आहे. फुड व्लॉगर सरबजीत सिंगने व्हिडिओ इंस्टाग्रावर शेअर केला आहे. ज्यात १० वर्षाचा जसप्रीस चिकन एग रोल बनवताना दिसत आहे.  (हेही वाचा-  चिनी शास्त्रज्ञांनी शोधला वृद्धत्व थांबवण्याचा उपाय; आता 130 वर्षे आरामात जगू शकतो मानव)

फूड व्लॉगरशी बोलताना जसप्रीसने सांगितले की, काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांचे आजाराने निधन झाले होते. त्यामुळे संपुर्ण फूड कार्टची जबाबदारी त्याने घेतली आहे. वडिलांकडून त्याने विविध रोल आणि रॅप्स बनवायला शिकले. मी गुरु गोविंद सिंग यांचा मुलगा आहे. जोपर्यंत माझ्यात ताकद आहे तो पर्यंत लढेन. हे शब्द नेटकऱ्यांची मनाला भिंडले.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मुलाला मदतीचा हात द्यायाचा ठरवलं. त्यांनी त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे. आनंद महिंद्रा यांनी Xच्या अधिकृत अंकाऊटवरून पोस्ट केली आहे. त्यांनी लिहले आहे की, “हिंमत ठेव, तुझे नाव जसप्रीत आहे. पण त्याच्या शिक्षण वाया जायला नको. मला विश्वास आहे, तो टिळक नगर, दिल्लीत आहे . जर कोणाला त्याचा संपर्क क्रमांक उपलब्ध असेल तर कृपया तो शेअर करा. महिंद्रा फाऊंडेशन टीम आम्ही त्याच्या शिक्षणाला कशी मदत करू शकतो याचा शोध घेईल.

आनंद महिंद्रा यांनी मुलाला मदत करण्याविषयी पोस्ट केल्यानंतर अनेक युजर्संनी त्यांचे कौतुक केले आहे. आनंदाची बाब म्हणजे काही नेटकऱ्यांनी त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मुलाच्या या ह्रदयपर्शी व्हिडिओला लाखो व्हूज आले आहे.