Coronavirus: उत्तर प्रदेश येथे कोरोना विषाणूच्या भीतीपोटी एका सरकारी कर्मचाऱ्याची कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या
Suicide Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूची लागण होऊन आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, लाखो लोक कोरोना विषाणुच्या विळख्यात अडकले आहेत. यामुळे सर्वत्र नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या भितीपोटी एका सरकारी कर्मचाऱ्याने थेट कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली आहे. ही घटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील सहारनपुर (Saharanpur) परिसरात घडली आहे. या घटनेची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे. चौकशी दरम्यान, त्यांना मृत व्यक्तीच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. यात कोरोनाची भिती वाटत असल्यामुळे आपण आत्महत्या करत आहोत, असे लिहले होते. या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या जगभरासह भारतात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरात या व्हायरसवरील उपायासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. मात्र अद्यापही यावर उपाचार न सापडल्याने सर्वांचाच जीव टांगणीला लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता करोनाच्या भीतीमुळे एका सरकारी कर्मचाऱ्याने त्याच्या कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केली. करोनाची भीती वाटत असल्याने आत्महत्या करत आहे, अशी चिठ्ठी या व्यक्तीच्या खिशात आढळून आली आहे. मागील काही काळापासून हा व्यक्ती सातत्याने नैराश्यात होता. असे त्याच्या कुटुंबीयांकडून कळत आहे. हे देखील वाचा- Coronavirus: बळीराजा तुझ्या बँक खात्यात 2 हजार रुपये जमा झाले का? पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना अंतर्गत केंद्र सरकार ट्रान्स्फर करतंय 5,125 कोटींचा निधी

एएनआयचे ट्वीट-

कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असतानाही रुग्णांच्या संख्येत सकारात्मक बदल झाला नाही. भारतात दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. एका पाठोपाठ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.