Haryana Political Crisis: हरियाणातील भाजप सरकारला झटका; 3 अपक्ष आमदारांनी काढून घेतला पाठिंबा
Haryana Political Crisis (PC - X/ PTI)

Haryana Political Crisis: हरियाणा (Haryana) च्या राजकारणात मंगळवारी मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळाली. तीन अपक्ष आमदारांनी (Three Independent MLAs) आज काँग्रेस (Congress) ला पाठिंबा दिला. हे सर्व आमदार यापूर्वी भाजप (BJP) सोबत होते. आज या तीन आमदारांनी भाजपच्या राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे राज्यातील भाजप सरकार (BJP Govt) अल्पमतात आले आहे. भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेणाऱ्यांमध्ये दादरीचे आमदार सोंबीर सांगवान, निलोखेरीचे आमदार धरमपाल गोंदर आणि पुंद्रीचे अपक्ष आमदार रणधीर गोलन यांचा समावेश आहे.

आमदारांची भाजप सरकारवर नाराजी -

विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा आणि प्रदेशाध्यक्ष उदय भान यांनी अपक्ष आमदारांनी काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्यावर पत्रकार परिषद घेतली. त्याचवेळी बादशाहपूरचे आमदार राकेश दौलताबाद हे देखील काँग्रेसला पाठिंबा देऊ शकतात. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने बरेच दिवस भाजपवर नाराज असलेले हे सर्व आमदार असल्याचे मानले जात आहे. अखेर मंगळवारी या सर्व अपक्ष आमदारांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केला. (हेही वाचा -Election Commission: भाजपने मुस्लिम आरक्षणाबाबत शेअर केलेला व्हिडिओ हटवा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे X ला निर्देश)

भाजप सरकारचे धोरण जनविरोधी असल्याचे काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांचे म्हणणे आहे. यामुळे त्यांनी काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ते आता काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी काम करतील. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उदय भान यांनी सांगितले की, भाजप सरकार जेजेपी आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार चालवत होते. मात्र, आज भाजपचे राज्य सरकार अल्पमतात आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी. त्यांना आता सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही.

याशिवाय माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी सांगितलं की, तीन अपक्ष आमदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. जनतेच्या पाठिंब्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात काँग्रेस सातत्याने मजबूत होत आहे. (वाचा -Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 39.22 टक्के मतदान; महाराष्ट्रात सर्वात कमी, तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान)

पहा व्हिडिओ - 

भाजप सरकार अल्पमतात -

हरियाणा विधानसभा ही 90 आमदार असलेली विधानसभा आहे. विधानसभेत सध्या 88 आमदार आहेत. यामध्ये भाजपचे 40, काँग्रेसचे 30 आणि जेजेपीचे 10 आमदार आहेत. याशिवाय हरियाणा लोकहित पक्षाचा (HLOPA) एक आमदार आणि INLD चा एक आमदार आहे. विधानसभेत 6 अपक्ष आमदारही आहेत. सध्या भाजप आणि जेजेपीची युती तुटली आहे. त्याचवेळी अपक्ष आमदारांच्या मदतीने सरकार चालवणाऱ्या भाजपच्या राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजपवर नाराज असलेल्या तीन अपक्ष आमदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे भाजपचे राज्य सरकार अल्पमतात आले आहे.