Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election) च्या तिसऱ्या टप्प्यात 93 मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार दुपारी 1 वाजेपर्यंत 10 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशात 39.22 टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत सर्वाधिक मतदान झाले, तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाले. या टप्प्यात पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गोवा, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीवमध्ये मतदान होत आहे.
दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे होती: आसाम 45.88%, बिहार 36.69%, छत्तीसगड 46.14%, गोवा 49.04%, गुजरात 37.83%, कर्नाटक 41.59%, मध्य प्रदेश 44.67%, महाराष्ट्र 31.18%, पश्चिम प्रदेश 31.25% बंगाल 49.27% आणि दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव 39.94%. (हेही वाचा - PM Narendra Modi Voting: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांनी बजावला मतदानाचा हक्क)
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात मतदान सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये मतदान केले. मतदान केल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले. आज मतदानाचा तिसरा टप्पा आहे. आपल्या देशात ‘दान’चे खूप महत्त्व आहे आणि त्याच भावनेतून देशवासीयांनी जास्तीत जास्त मतदान करावे. मतदानाच्या 4 फेऱ्या अजून बाकी आहेत. गुजरातमधील एक मतदार म्हणून, हे एकमेव ठिकाण आहे जिथे मी नियमितपणे मतदान करतो आणि अमित भाई येथून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. (वाचा -Gujarat Lok Sabha Election 2024: गुजरात च्या Nadiad मध्ये दोन्ही हात गमावलेल्या Ankit Soni ने पायाने बजावला मतदानाचा अधिकार)
मतदानानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी पत्नी सोनल शाह यांच्यासह कामेश्वर महादेव मंदिरात पूजा केली. आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. मी देशभरातील तमाम मतदारांना आणि गुजरातच्या मतदारांनाही कळकळीचे आवाहन करू इच्छितो की, लोकशाहीच्या या उत्सवात पुढे यावे आणि एक सुरक्षित, समृद्ध देश देणारे स्थिर सरकार निवडून द्यावे. असे सरकार निवडून द्या जे भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, ज्याला गरिबी हटवायची आहे, स्वावलंबी भारत बनवायचा आहे, विकसित भारत बनवायचा आहे आणि संपूर्ण जगात भारताला प्रत्येक क्षेत्रात प्रथम क्रमांकावर नेण्याची इच्छा आहे, असं अमित शहा यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर म्हटलं आहे.