Karnataka: कर्नाटकात 9वीत शिकणाऱ्या मुलीने दिला मुलाला जन्म; वसतिगृहातील वॉर्डन निलंबित
Baby | Representational image (Photo Credits: pxhere)

Karnataka: कर्नाटकमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील एका सरकारी निवासी शाळेतील इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनीने चिक्कबल्लापुरा (Chikkaballapur) येथील रुग्णालयात बाळाला जन्म दिला. त्यानंतर वसतिगृहाच्या वॉर्डनला निलंबित (Hostel Warden Suspended) करण्यात आले आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो (Pocso) अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितले की, 14 वर्षीय मुलगी राज्याच्या तुमाकुरू जिल्ह्यातील एका सरकारी निवासी शाळेच्या वसतिगृहात राहात होती. बागेपल्ली तालुक्यातील तिच्या घरी येऊन पोटदुखीची तक्रार केल्यावर ही गर्भवती असल्याची बाब उघडकीस आली.

पोलिसांनी सांगितले की तिचे पालक तिला रुग्णालयात घेऊन गेले जेथे स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांना ती गर्भवती असल्याचे आढळले. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी 9 जानेवारीला तिची प्रसूती केली. सध्या मुलीची आणि बाळाची प्रकृती स्थिर असल्याची सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - HC on Husband Chromosomes and Child Gender: मुलीला जन्म दिला म्हणून सासरच्यांकडून सुनेचा छळ, हायकोर्ट म्हणाले- 'जन्माला येणाऱ्या बाळाचे लिंग हे पुरुषाच्या गुणसूत्रावर अवलंबून असते')

पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल -

रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम 376 आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समुपदेशनादरम्यान, विद्यार्थिनीने बाल कल्याण समितीला सांगितले की, तिच्या शाळेतील एका वरिष्ठ विद्यार्थ्यापासून तिला गर्भधारणा झाली. परंतु चौकशीदरम्यान किशोरीने ते नाकारले. (हेही वाचा - HC On Wife Refusal Of Sex: 'पत्नीने पतीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देणे ही क्रूरता', उच्च न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट)

आम्ही गुन्हा दाखल केला आहे. परंतु, अद्याप या घटनेच्या संदर्भात कोणालाही अटक केलेली नाही. विद्यार्थी आणि तिचे पालक उघडपणे बोलत नाहीत. त्याचे समुपदेशन केले जात आहे, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. दरम्यान, तुमाकुरू जिल्हा प्रशासनाने वसतिगृहाच्या वॉर्डनला निलंबित केले आहे.