HC on Husband Chromosomes and Child Gender: एका हुंडा प्रकरणी सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने तिखट टीका केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान महिलेच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, त्यांच्या मुलीने मुलीला जन्म दिल्यानंतर सासरच्या मंडळींकडून तिच्यावर अत्याचार सुरु आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, मुलगी किंवा मुलगा जन्माला येणे हे पुरुषाच्या गुणसूत्रांवरून ठरवले जाते. ही बाब लोकांना समजणे खूप महत्त्वाचे आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, अशा गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना शिक्षित करणे आवश्यक आहे की, जन्माला येणाऱ्या बाळाचे लिंग हे त्यांच्या मुलाच्या गुणसूत्रांवर अवलंबून असते. (हेही वाचा: True Love Between Adolescents: 'किशोरवयीन मुलांमधील खरे प्रेम हे पोलिसांच्या कारवाईने नियंत्रित करता येत नाही'- Delhi High Court)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)