दिल्ली उच्च न्यायालयाने नुकतेच असे निरीक्षण नोंदवले आहे की, दोन व्यक्तींमधील खरे प्रेम (यातील भलेही एक अल्पवयीन असो वा दोघेही अल्पवयीन असो), कायद्याच्या कठोरतेने किंवा राज्य कारवाईद्वारे नियंत्रित केले जाऊ शकत नाही. जी अशी अल्पवयीन जोडपी एकमेकांशी लग्न करतात, शांततापूर्ण जीवन जगतात, आपले कुटुंब वाढवतात आणि देशाच्या कायद्याचे पालन करतात, त्यांच्या विरुद्धच्या राज्य किंवा पोलीस कारवाईचे समर्थन करण्याचा प्रयत्न करणे हे न्यायालयासाठीदेखील कठीण होते. न्यायालयाने पुढे म्हटले, 'जेव्हा अशा प्रकरणांबाबत निर्णय द्यायचा असतो तेव्हा ते गणितीय सूत्रांच्या आधारावर नसते. एका बाजूला कायदा असतो, तर दुसऱ्या बाजूला अशा जोडप्यांचे संपूर्ण आयुष्य, त्यांची मुले, त्यांचे कुटुंब असते.'

एका अल्पवयीन मुलीला घेऊन पळून गेलेल्या आणि मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्न करणाऱ्या आरिफ खानविरुद्ध दाखल झालेला अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा रद्द करताना न्यायमूर्ती शर्मा यांनी ही निरीक्षणे नोंदवली. याबाबत मुलीच्या वडिलांनी एफआयआर नोंदवला होता. लग्नंतर जेव्हा मुलगी सापडली तेव्हा ती पाच महिन्यांची गर्भवती होती. हे मुल आपल्या वैवाहिक नातेसंबंधातून आणि पतीवरील प्रेमातून जन्माल येत असल्याचे सांगत तिने गर्भपात करण्यास नकार दिला. (हेही वाचा: Minor Girl Kidnapped: वसतीगृहातील अल्पवयीन मुलीचे अपहरण, गोवा पोलिसांकडून आरोपीस मुंबई येथून अटक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)