7th Pay Commission: सातवा वेतन आयोग अंतर्गत अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत नोकरीची मोठी संधी; भरपूर पगार मिळवण्यासाठी येथे करा अर्ज

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. एवढेच नव्हेतर देशातील अनेक कंपन्यांना टाळेदेखील लागले आहे. तसेच देशात मोठ्या संख्येने बेरोजगारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळे प्रत्येकजण सरकारी नोकरीच्या शोधात आहे. याचा पार्श्वभूमीवर अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत सिनिअर रेजिडेंट्स पदासाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या एकूण 131 पदासाठी सातवे वेतन लागू होणार आहे. ज्यामुळे निवडक कामगारांना अधिक पगार मिळण्याची शक्यता आहे. या नोकरीसाठी इच्छुक असलेले उमेदवार एम्सच्या अधिकृत वेबसाइट www.aiimsjodhpur.edu.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात.

अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, वरील सर्व जागा सातवे वेतन आयोगा अंतर्गत काढण्यात आली आहेत. एकूण 41 विभागातील 131 रिक्त जागेवर सिनिअर रेजिडेंट्स पदासाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक असलेले उमेदवार 14 जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या नोकरीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवाराला एम्सच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. हे देखील वाचा- Mental Health Insurance : मानसिक आजारासाठी विमा संरक्षण का नाही?; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 पर्यंत असणे गरजेचे आहे. आरक्षित वर्गातील उमेदावारांसाठी वयाची कोणतीही अट नाही. उमेदवार 41 विभागापैकी एका ठिकाणी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी येथे क्लिक करा.

पीडब्ल्यूबीडी उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. सर्वसाधारण आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये, अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना 800 रुपये भरावे लागतील. निवडलेल्या सर्व उमेदवारांची यादी www.aiimsjodhpur.edu.in वर प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारांना संस्थेची वेबसाइट नियमितपणे तपासण्याचा सल्ला दिला जात आहे.