7th Pay Commission News: मागील काही दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी त्यांच्या बेसिक सॅलरी (Basic Salary) मध्ये वाढ कधी होतेय? याची वाट पाहत आहेत. दरम्यान नरेंद्र मोदी सरकारच्या कॅबिनेट बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होणं अद्याप बाकी आहे. आगामी कॅबिनेट बैठकीत तो मंजूर होण्याची शक्यता असताना दिल्लीमध्ये परिवहन निगमच्या कर्मचार्यांसाठी सातव्या वेतनाच्या शिफारशीनुसार, प्रवासी भत्ता देण्याचा निर्णय करण्यात आलं आहे. यामध्ये 11हजाराहून अधिक कर्मचार्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे. 7th Pay Commission: सातवे वेतन आयोगाच्या अंतर्गत ग्रॅज्युटी नियमात बदल; लाखो कर्मचाऱ्यांना मिळतोय अधिक फायदा.
परिवहन निगम सोबतच डीटीसीच्या सुमारे 12 हजाराहुन अधिक कॉन्ट्रॅक्ट कर्मचार्यांना युनिफॉर्म देण्याचा निर्णयदेखील देण्यात आला आहे. डीटीसी च्या म्हणण्यानुसार नियमित कर्मचार्यांना त्यांचे डेस्टिनेशन पास द्यावे लागतील त्यानंतर प्रवासी भत्त्याचा लाभ मिळणार आहे.
रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये कॉन्ट्रॅक्ट आणि नियमित कर्मचार्यांना या दिन्ही प्रस्तावांचा फायदा मिळणार आहे. युनिफॉर्मच्या खर्चाबद्दल डीटीसीच्या एका अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, यामुळे प्रतिवर्षी 4.61 कोटी र रूपयांचा खर्च वाढणार आहे.