Delhi Building Collapse: दिल्लीत जेजे कॉलनी परिसरात इमारत कोसळल्याने 4 जणांचा मृत्यू
Image For Representation Building Collapsed (Photo Credits-Twitter)

Delhi Building Collapse: गुरुग्रामनंतर आता दिल्लीतही इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दिल्लीतील बवाना भागातील जेजे कॉलनीतील (JJ Colony) आहे. ज्यामध्ये ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. याआधी पोलिसांनी सांगितले होते की, ढिगाऱ्यातून 3 जणांना बाहेर काढण्यात आले आहे, तर उर्वरितांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. मात्र, अजूनही लोकांचा शोध सुरू आहे.

डीसीपी आऊटर नॉर्थ ब्रिजेंद्र यादव यांनी या घटनेची माहिती दिली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एकूण 6 जण अडकल्याची माहिती मिळाली असून त्यापैकी 3 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (वाचा - Jammu and Kashmir: Bandipora मध्ये पोलीस दलावर दहशतवादी हल्ला, एक पोलीस शहीद, 5 जवान जखमी)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 2.45 च्या सुमारास एनआयए पोलिस स्टेशनच्या पोलिसांना दिल्ली जल बोर्डाजवळील एक इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. ज्यामध्ये काही लोक गाडले गेले आहेत. यात काही मुलांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले. राजीव रतन आवासमध्ये ही इमारत बांधण्यात आली. जिथे जवळपास 300-400 फ्लॅट आहेत.

दरम्यान, बचावकार्यासाठी तातडीने तीन जेसीबी मागवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचल्या. फातिमा आणि शहनाज या दोन महिलांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र असे असूनही एक मुलगी आणि काही लोक अजूनही ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. ज्यांना वाचवता आले नाही. आता त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

याआधीही अशीच एक घटना दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये समोर आली होती. येथे सेक्टर 109 मध्ये एका फ्लॅटचे छत अचानक कोसळले, त्यामुळे अनेक कुटुंबे या घटनेमुळे उद्धवस्त झाले होते. या घटनेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.