
Two Km Road Stolen In Bihar: बिहारच्या (Bihar) बांका जिल्ह्यात (Banka District) एक रस्ता चोरीला (Road Stolen) गेला. हे धक्कादायक प्रकरण जिल्ह्यातील राजौन ब्लॉकमधील खारौनी गावाशी संबंधित आहे. येथे सुमारे 2 किमी रस्ता एका रात्रीत गायब झाला. रस्त्याऐवजी नांगरलेले शेत दिसत होते. 5 दिवसांपूर्वी सायंकाळपर्यंत या रस्त्यावरून लोकांनी ये-जा केली. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी या रस्त्यावरून जाणारे लोक येथे पोहोचताच आश्चर्यचकित झाले.
लोकांनी दुसऱ्या दिवशी रस्त्या पाहिला तर त्यांना संपूर्ण रस्ता गायब झालेला पाहायला मिळाला. सुरुवातीला काही लोकांना वाटले की, त्यांचा रस्ता चुकला आहे. रस्ता अचानक संपला आणि समोर फक्त शेत दिसत होते. ज्यात पीक लावले होते. नंतर रस्ता चोरीला गेल्याचे दिसून आले. यानंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. (हेही वाचा -Bihar Rail Engine Theft Case: बोगदा खोदून चोरट्यांनी चोरलं रेल्वेचं इंजिन; बिहारमध्ये चोरांचा अनोखा पराक्रम)
दोन गावांना जोडणारा रस्ता नांगरून गुंडांनी तेथे गव्हाची पेरणी केली आहे. नजीकच्या खरौणी गावातील लोकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. खादमपूर गावातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून फूटपाथच्या सहाय्याने ये-जा करावी लागत आहे. या गुंडांना गावातील लोकांनी विरोध केला. मात्र, त्यांनी गावकऱ्यांना लाठ्या-काठ्या घेऊन हाकलून लावले. आता खादमपूर गावातील लोकांनी याबाबत मंडळ अधिकारी मोहम्मद मोईनुद्दीन यांना बुधवारी निवेदन दिले आहे. तसेच यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
दरम्यान, खादमपूर गावातील आशुतोष सिंग, प्रदीप कुमार, विनय सिंग, संजय सिंग, मुन्नी देवी, अजय कुमार सिंग, रितू कुमारी, प्रमोद सिंग, अनिता देवी, राजेश्वरी देवी यांच्यासह सुमारे 35 जणांनी मंडळ अधिकाऱ्यांना अर्ज दिले आहेत. खरौणी गावाकडून खडमपूर गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गव्हाची पेरणी झाल्याचे लोकांनी सांगितले. ये-जा करण्यासाठी अनेक वर्षांपासून ते या रस्त्याचा वापर करत आहेत. यावेळी अचानक खैरानी गावातील लोकांनी ट्रॅक्टरच्या साह्याने रस्ता नांगरून त्यावर गव्हाची पेरणी केली. खादमपूर गावातील लोकांनी याला विरोध केल्यावर त्यांच्यात हाणामारी सुरू झाली.
विभागीय अधिकारी राजौन मंडळ अधिकारी मोहम्मद मोईनुद्दीन यांनी सांगितले की, लवकरच कारवाई केली जाईल. रस्त्यावरील अतिक्रमणाची बाब माझ्या निदर्शनास आली आहे. कर्मचारी पाठवून प्रकरणाची चौकशी केली जाईल. ही बाब योग्य आढळून आल्यास अतिक्रमण तातडीने हटविण्यात येईल. यासोबतच अतिक्रमण करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल.