Ragging (Photo Credits: Representative Photo)

Forced To Lick Toilet Seat: केरळ (Kerala) मधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका 15 वर्षीय विद्यार्थ्याने 15 जानेवारी रोजी कोची (Kochi) येथील एका खाजगी शाळेत कथितरित्या रॅगिंग (Ragging) आणि छळ सहन केल्यानंतर आत्महत्या (Suicide) केली. गंभीर अपमान सहन करणाऱ्या या विद्यार्थ्याने शाळेतून घरी परतल्यानंतर आत्महत्या केली. मृत मुलाच्या आईने सांगितले की, तिच्या मुलाला टॉयलेट सीट चाटण्यास भाग पाडले गेले. तसेच टॉयलेट फ्लश करताना त्याचे डोके टॉयलेटमध्ये ढकलण्यात आले.

मृत मुलाच्या आईने मागितला न्याय -

या घटनेनंतर मृत मुलाची आईने थ्रिपुनिथुराच्या हिल पॅलेस पोलिस स्टेशनमध्ये औपचारिक तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांनी बाल आयोगाकडे देखील याचिका सादर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी मुलाला झालेल्या छळाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. याचिकेत शाळेच्या उपप्राचार्यांकडून गैरवर्तन केल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. (हेही वाचा -MBBS Student Dies After Ragging: गुजरातमध्ये वरिष्ठांच्या रॅगिंगमुळे एमबीबीएसच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; 3 तास उभे राहिल्यानंतर पडला बेशुद्ध)

तपासात धक्कादायक गैरवर्तन उघड -

मुलाच्या या कठोर पावलाचे कारण समजून घेण्यासाठी, आई आणि कुटुंबातील सदस्यांनी मुलाच्या मित्रांशी संवाद साधला. याशिवाय, त्याच्या सोशल मीडियाची तपासणी केली. त्यानंतर आईला मुलासोबत झालेले गैरवर्तन उघडकीस आले. मृत मुलाच्या आईने दावा केला की, तिच्या मुलावर शारीरिक हल्ला करण्यात आला. त्याला शिवीगाळ करण्यात आली आणि अकल्पनीय अपमान सहन करावा लागला, ज्यामध्ये त्याला जबरदस्तीने वॉशरूममध्ये नेण्यात आले आणि टॉयलेट सीट चाटायला लावण्यात आले. तसेच त्याचे डोके फ्लशिंग टॉयलेटमध्ये ढकलण्यात आले. (हेही वाचा -

शाळेच्या अधिकाऱ्यांकडून सत्य दाबण्याचा प्रयत्न -

दरम्यान, मुलाच्या मृत्यूनंतर मित्रांनी न्यायाची मागणी करणारे एक इंस्टाग्राम पेज तयार केले. परंतु शाळेने दबाव आणल्यानंतर ते काढून टाकण्यात आले. आईचा दावा आहे की, शाळेच्या अधिकाऱ्यांनी सत्य दाबण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी शाळेच्या अधिकाऱ्यांकडे पुरावे घेऊन गेलो आणि जबाबदारीची मागणी केली, तेव्हा त्यांनी मला फक्त एवढेच सांगितले की, माहिती पोलिसांना पाठवण्यात आली आहे. शाळेची प्रतिष्ठा जपण्यासाठी ते या घटनांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मी माझ्या मुलासाठी न्याय मागत आहे. त्याचा मृत्यू व्यर्थ जाऊ नये. या क्रूर कृत्यासाठी जबाबदार असलेल्यांना कादेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. माझ्या मुलासारखे इतर कोणत्याही मुलाला त्रास सहन करावा लागू नये, यासाठी मी न्याय मागत आहे.