Ragging (फोटो सौजन्य - फेसबुक)

MBBS Student Dies After Ragging: गुजरात (Gujarat) मधील पाटण जिल्ह्यातील (Patan District) एका वैद्यकीय महाविद्यालयात (Medical College) रॅगिंगमुळे (Ragging) एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मेडिकल कॉलेजच्या एमबीबीएस (MBBS) च्या पहिल्या वर्षाच्या 18 वर्षीय विद्यार्थ्याला त्याच्या वरिष्ठांनी कथित रॅगिंग दरम्यान तीन तास उभे राहण्यास भाग पाडले. यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. शनिवारी झालेल्या या घटनेची महाविद्यालयाने चौकशी सुरू केली आहे.

महाविद्यालयाचे डीन डॉ. हार्दिक शाह यांनी सांगितले की, शनिवारी रात्री धारपूर, पाटण येथील जीएमईआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या वसतिगृहात वरिष्ठांनी रॅगिंगच्या वेळी तीन तास उभे केल्याने पीडित अनिल मेथानिया बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. सर्वतोपरी प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. कॉलेजच्या अँटी रॅगिंग समितीने तपास सुरू केला आहे. रॅगिंगसाठी वरिष्ठ विद्यार्थी जबाबदार आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असंही हार्दिक शाह यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा -Student Ragging Case : चाकू घेऊन धावायचे, बाथरूममध्ये कोंडायचे; रॅगिंगमुळे दिव्यांग विद्यार्थिनीला ब्रेन स्ट्रोक)

दरम्यान, बालिसणा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थ्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विद्यार्थ्याचा भाऊ धर्मेंद्र मेथानिया यांनी सांगितले की, कुटुंबाला कॉलेज आणि सरकारकडून न्याय मिळेल अशी आशा आहे. मला माझ्या काकांचा फोन आला की, माझ्या चुलत भावाला बेशुद्ध पडल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेव्हा मी येथे पोहोचलो तेव्हा मला कळले की त्यांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा - Ragging in Bengaluru: खासगी कॉलेजच्या बीबीए एव्हिएशनच्या ज्युनिअर विद्यार्थ्यीची रॅगिंग, तीन सिनिअर्सवर कारवाई)

तथापी, महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने सांगितले की, सात-आठ वरिष्ठ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ विद्यार्थ्यांच्या गटाला सुमारे तीन तास उभे राहण्यास भाग पाडले आणि एक-एक करून त्यांची ओळख करून देण्यास सांगितले. त्यांनी आम्हाला उभे राहण्यास भाग पाडले. आमच्यासोबत उभा असलेला एक विद्यार्थी बेशुद्ध पडला. आम्ही त्याला रुग्णालयात नेले. मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाला.