बीड येथील घटनेवरून निलेश राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका; 15 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
राष्ट्रीय
अण्णासाहेब चवरे
|
Nov 15, 2020 11:55 PM IST
राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे उद्यापासून (सोमवार, 26 नोव्हेंबर) उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. त्यामुळे राज्यभरातील 'भक्त' मंडळींच्या आनंदाला उधान आले आहे. मात्र, मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी नियम आणि अटींचे पालन काटेकोरपणे पालन केले जाईल याची दक्षता भक्तांना घ्यावी लागणार आहे. मंदिरात जाताना कोणत्याही स्थितीमध्ये मास्क वापरणे बंधनकारक आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी कोणत्या नियमांचे पालन करायचे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवाहन केले आहे. या अवाहनात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, प्रार्थनास्थळांतील गर्दी टाळा. गाभाऱ्यात, प्रार्थनास्थलात जाताना गर्दी टाळा. शिस्तपालन आवश्यक, मार्गदर्शक सूचनांचे पालन आवश्यक आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाच्या काळात विवाहांवेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी मंगल कार्यालयं बंद आहेत. अशा वेळी नागरिक रिसार्टला मोठ्या प्रमाणावर पसंती देताना दिसत आहेत. काही मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत रिसॉर्टवर विवाह सोहळा आयोजित करणयाचा ट्रेण्ड वाढताना दिसतो आहे. त्यामुळे रिसॉर्ट व्यावसायिकांच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला मंगल कार्यालय व्यावसायिकांचे उत्पादन मात्र बरेचसे घटत असल्याचे पाहायाल मिळत आहे.
कोरोना काळात घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अवघे जग ठप्प झाले. अशा वेळी घरी थांबून करायचे काय असा सवाल अनेकांच्या पुढे निर्माण झाला होता. अशा स्थितीत अनेकांनी ऑनलाईन वेबसीरिज, चित्रपट, मालिका पाहण्यााला प्राधान्य दिले. तर काहींनी वाचनाद्वारे आपला व्यासंघ वाढविण्याचा प्रयत्न केला. व्यासंघ वाढविणाऱ्यांचा टक्का लॉकडाऊन काळात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा ग्रंथविक्री आणि ग्रंथखरेदी यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यात दिवाळी अंकांचाही समावेश आहे. दिवाळी आणि लॉकडाऊन काळात ग्रंथविक्री मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे प्रकाशक आवर्जून सांगतात.
दरम्यान, कोरोना व्हायरस, जागतिक, स्थानिक राजकारण, शेती, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, क्रीडा, संस्कृती, यांसह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा ताजा तपशील पाण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.