काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल य़(Senior Congress Leader Ahmed Patel) यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना गुरुग्राम येथील मेदांता हॉस्टपिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार (Ahmed Patel Admitted in ICU) सुरु आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीच्याच काही दिवसांमध्ये अहमद पटेल (Ahmed Patel) यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह येण्यापूर्वी काहीच दिवस आगोदर त्यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आपला सहभाग नोंदवला होता.
अहमद पटेल हे काँग्रेस पक्षातील एक महत्त्वाचे ज्येष्ठ नेते आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे ते प्रदीर्घ काळ सल्लागार राहिले आहेत. काँग्रेस हा एक देशातील सर्वात जुना पक्ष आहे. अशा पक्षाला सल्ला देण्याचे महत्त्वपूर्ण काम पटेल गेली अनेक वर्षे करत आले आहेत. गांधी परिवार आणि काँग्रेस पक्षातील अनेक महत्त्वाच्या आणि अत्यंत संवेदनशील गोष्टींची माहिती असणाऱ्यांपैकी एक नेते अशी त्यांची ओळख आहे. सांगितले जाते की, माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या निधनानंतर अहमद पटेल यांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच सोनिया गाधी भारतीय राजकारणा आणि प्रामुख्याने काँग्रेसमध्ये स्थिरस्थावर झाल्या. काँग्रेस पक्षातील तत्कालीन नेते पी.व्ही. नरसिंह राव यांच्याशी मतभेद होऊनही सोनिया गांधी यांचे काँग्रेसमधील स्थान बळकट राहिले. राहुल गांधी हे सुदधा अनेकदा अहमद पटेल यांचाच सल्ला घेतात असे सांगितले जाते.
अहमद पटेल यांनी महानगरपालिका निवडणुकांपासून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. पुढे ते पंचायत समिती सभापती बनले. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुढे त्यांचा राजकीय उत्कर्ष झाला आणि ते काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बनले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना लावण्यात आलेल्या 1977 च्या आणिबाणीनंतर काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला. परंतू, त्यानंतर पुढच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसाल मोठा विजय मिळाला. या विजयात अहमद पटेल लोकसभेवर पहिल्यांदा निवडूण गले. तेव्हापासून ते 1977, 1980,1984 असे तीन वेळा लोकसभेवर निवडूण आले. ते तीन वेळा लोकसभा आणि पाच वेळा राज्यसभा खासदार राहिले आहेत. 1993,1999, 2005, 2011, 2017 पासून आजतागायत ते राज्यसभेवर काँग्रेसचे खासदार आहेत. (हेही वाचा, Rohini Khadse Tests Positive: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्षा रोहिणी खडसे कोरोना व्हायरस संक्रमित)
Senior Congress leader Ahmed Patel, who tested positive for COVID-19 a few weeks ago, admitted to ICU of Medanta Hospital, Gurgaon for further treatment, says his family
— Press Trust of India (@PTI_News) November 15, 2020
दरम्यान, देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांचा आकडा 88 लाखांच्याही पार गेला आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना संक्रमितांपैकी 82 लाख पेक्षाही अधिक नागरिक कोरोना व्हायरस संक्रमनातून मुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशभरातील कोरोना व्हायरसमधून मुक्त होणाऱ्या नागरिकांचे सरासरी प्रमाण 93.09 टक्के इतके आहे.