राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या, जळगाव जिल्हा मध्यवर्थी बँक (Jalgaon District Central Cooperative Bank) अध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. रोहिणी खडसे यांनी स्वत:च ट्विट करुन ही माहिती दिली आहे. ''माझी कोरोनाची चाचणी positive आली असून प्रकृती उत्तम आहे सावधता म्हणुन रुग्णालयात दाखल होत आहे'' असे रोहिणी खडसे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खडसे यांच्यासोबतच त्यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि असंख्य कार्यकर्तांनीही राषख्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रोहिणी खडसे या राजकारणात सक्रीय आहेत. सध्या त्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आहेत. याशिवाय जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातही त्यांची सक्रियता मोठ्या प्रमाणावर असते. (हेही वाचा, Covid Care Centre: कोरोना रुग्णांसाठी आनंदाची बातमी; दिवाळी निमित्त मुंबईतील अनेक कोविड सेंटर्सने घेतला 'हा' निर्णय)
माझी कोरोनाची चाचणी positive आली असून प्रकृती उत्तम आहे सावधता म्हणुन रुग्णालयात दाखल होत आहे.
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) November 15, 2020
विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाने रोहिणी खडसे यांना तिकीट नाकारले. दुसऱ्या बाजूला रोहिणी खडसे यांना तिकीट दिले. परंतू, भाजप तिकीटावर उभ्या राहिलेल्या रोहिणी खडसे यांचा मुक्ताईनगर मतदारसंगात निसटता पराभव झाला. मुक्ताईनगर मतदारसंघातून रोहिणी खडसे यांच्या विरोधात उभा असलेला शिवसेना उमेदवार निवडूण आला. हा पराभव एकनाथ खडसे यांच्या जिव्हारी लागला.
दरम्यान, रोहिणी खडसे यांचा पराभव करण्यात आला. त्यासाठी पक्षातीलच काही लोक जबाबदार असल्याचे एकनाथ खडसे यांनी जाहीरपणे म्हटले होते. आता तर खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच प्रवश केला आहे. त्यांच्यासोबत रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.