
आजपासुन नोंव्हेबर महिना सुरु होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या अडचणीत माठ्याप्रमाने वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच सामन्य माणासाच्या खिशाला कात्री लागणार आहे, तसेच याचा परिणाम रोजच्या कामगाजावर होणार आहे जाणून घेऊया 1 नोव्हेंबरपासून कोणत्या गोष्टी बदलणार?
गॅसच्या किमंतीत वाढ

सिंलिडरचा काला बाजार रोखता यावा म्हणुन एक नवीन उपक्रम योजण्यात आला आहे. गॅस एजन्सीच्या विक्रेत्याकडून एलपीजी सिलिंडर घरपोच मिळेल, त्यांना 1 नोव्हेंबरपासून नवीन नियमांनुसार या सेवेचा लाभ मिळू शकेल. नवीन नियम असा असेल की आता ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो OTP गॅस विक्रेत्याला सांगावा लागेल. या ओटीपीच्या आधारे एलपीजी सिलिंडर घरपोच दिला जाईल. यापूर्वी कुणाचा सिलिंडर दुसऱ्याला चढ्या किंमतीत विकला जात होता, मात्र ओटीपी व्यवस्था सुरु केल्याने तसे आता होणार नाही.
भारतीय रेल्वे गाड्याच्या वेळेत करणार बदल

कोरोना लॉकडाऊन संपल्यानंतर, रेल्वे आपल्या गाड्यांची संख्या वाढवणार आहे. परंतु वाहतूक अजूनही संपूर्णरित्या पूर्वपदावर आलेली नाही. रेल्वे सध्या फक्त विशेष गाड्या चालवत आहे. भारतीय रेल्वे देशभरातील गाड्यांच्या वेळेत बदल करणार आहे. 1 नोव्हेंबरपासून गाड्यांचे नवे वेळापत्रक लागू होणार आहे. एका अहवालानुसार, पॅसेंजर गाड्यांसोबतच मालगाड्यांचाही नव्या बदलांमध्ये समावेश करण्यात आला आहे, ज्यांचे वेळापत्रक बदलू शकते. त्याचप्रमाणे देशात धावणाऱ्या सुमारे 30 राजधानी गाड्यांच्या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे.
व्हॉट्सअॅप काही आयफोन आणि अँड्रॉईड फोनवर काम करणे करणार बंद

Whtsapp दिलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबरपासून फेसबुकच्या मालकीचे प्लॅटफॉर्म Android 4.0.3 Ice Cream Sandwich, iOS 9 आणि KaiOS 2.5.0 ला सपोर्ट करणार नाही. ज्या स्मार्टफोनवर ते सपोर्ट करणार नाहीत. यामध्ये Samsung, ZTE, Huawei, Sony, Alcatel या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.
बॅक ऑफ बडोदात होणार बदल

बँक ऑफ बडोदात 1 नोव्हेंबरपासून बँकेत रोख रक्कम जमा करणे आणि पैसे काढण्याचे नियम बदलणार आहेत. बँक ऑफ बडोदाकडून यासंदर्भात नियमावली जारी करण्यात आली आहे. बँक एका ठराविक मर्यादेनंतर रोख रक्कम काढणे किंवा रोख रक्कम जमा करण्यावरील शुल्कात बदल करणार आहे. हा नवा नियम बचत आणि सॅलरी या दोन्ही खात्यांवर लागू होणार आहे. बँक ऑफ इंडिया, पीएनबी, अॅक्सिस बँक आणि सेंट्रल बँकही लवकरच असा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
दिल्लीत 1 नोव्हेंबरपासून सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था उघडण्यास परवानगी

दिल्लीत 1 नोव्हेंबरपासून सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, ज्यांना ऑनलाइन अभ्यास सुरू ठेवायचा आहे ते करू शकतात. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.